अखेर बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर, २८ रोजी लागणार निकाल

0
1131
गोवा खबर:बारावीच्या परिक्षेचा निकाल अमुक तमुक तारखेला लागणार असे सांगत सोशल मीडियावर धुमाकुळ घालणाऱ्यांचे उद्योग आता बंद होणार आहे.बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख आज जाहीर झाली आहे.
 गोवा शालान्त मंडळाने यंदा घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे.
शालान्त मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी या तारखेची घोषणा केली आहे. यंदा सुमारे १८ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. १२ वीच्या निकालाबाबत गेले दोन दिवस उलट सुलट चर्चा सुरु होती. मात्र निकाल शनिवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येईल असे सामंत यांनी आज स्पष्ट केले.
शालान्त मंडळाकडून शनिवारी सकाळी १० वाजता वेबसाईट्सवरुनही निकाल प्रसिद्धहोणार आहे. तसेच एसएमएस व आयव्हीआरएसद्वारेही आपला निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.
या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध असेल.
त्याशिवाय एसएमएसद्वारेGOA12<space>SEAT NUMBER –टाईप करून 56263 क्रमांकावर, GOA12<space> सीट नंबर टाईप करून58888, GOA12<space>सीट नंबर टाईप करून 5676750 व GB12<space>सीट नंबर टाईप करून 54242 वर मेसेज पाठवल्यास निकाल जाणून घेता येईल.