अकार्यक्षम सरकारचे देखील आउटसोर्सिंग करा:शिवसेना

0
2344
गोवाखबर:गोव्यातील व्यवसायीक आणि स्वयंरोजगार करणार्‍याना बेरोजगार करून बाहेरील बड्या कंपन्यांना व्यवसाय देण्याचा सपाटा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने लावला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना राज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांनी केला आहे. गावस यानी दिलेल्या माहितीनुसार गोमेकोतील सुमारे सात औषधालय बंद करण्यात आली असून वेलनेस फॉरेवर ह्या बंगळूर स्थित कंपनीला पुर्ण कंत्राट देण्यात आहे. ई निवीदा काढताना जाचक अटी व नियम लागू करून गोव्यातील व्यावसायिकांना कंत्राट न मिळण्याची खबरदारी घेण्याचे कट कारस्थान चालू असून ठरावीक बाहेरील कंपन्यानी गोव्यात येण्याचा सोयीस्कर माग॔ उपलब्ध करून दिला जात असल्याचा आरोपही गांवस यानी केला आहे.
पंधरा कोटी आर्थिक उलाढाल असलेले कॅन्टीन व्यावसायिक गोव्यात आहेत का असा प्रश्न  गावस यानी उपस्थित केला आहे.लॉंडडरीवालयाच्या पण व्यवसायवर गोमेकॉने गदा आणली अहल्याचा आरोप गांवस यानी केला आहे. एका बाहेरच्या कंपनीला कपडे धुण्याचे कंत्राट देऊन कित्येक लहान सहान गोव्यास्थीत कष्टकरी धोबी व्यवसायीकांवर व्यवसाय बंद करण्याची पाळी आणली गेल्याबद्दल गांवस यांनी  तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. बेरोजगारीचे संकट गोव्यावर असून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे अशा प्रकारे निणय घेउन गोव्यातील तरूणांच्या नोकरी व व्यवसाय बाहेरील बड्या उद्योजकांना देऊन गोव्यातील लोकांची ऊपेक्षा करत आहेत,अस गांवस यांनी म्हटले आहे.वाहतूक नियम भंग करणाऱ्यांचे परवाने तिन महीन्यासाठी स्थगित करणे अयोग्य असल्याचे मत गांवस यांनी  व्यक्त केले. गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांवर या निर्णयाचा वाईट परिणाम होणार असल्याची भिती गांवस यानी बोलून दाखवली.तिन महीने परवाना  स्थगित केलेल्या चालकाना बीना परवाना वाहन चालवायला न मिळाल्यामुळे उपासमाराची पाळी येऊ शकते. सरकारने संवेदनशील होऊन परवाना रद्द  न करता दंडाची रक्कम वाढवण्यासाठी कायदा दुरूस्त करण्याचा सल्ला गांवस यानी दिला आहे.जर गोव्यातील व्यावसाइक दर्जेदार सेवा देण्यास पात्र नसतील तर हे विद्यमान सरकार देखील लोकांस दर्जेदार प्रशासन देण्यास अपात्र आहे त्यामुळे त्यांनी भाजप आघाडी सरकार हे नितीन गडकरी यांच्याकडे चालवायला द्यावे असा उपरोधातमक सल्ला गांवस यानी दिला आहे.
 महिला संपर्क प्रमुख रीया पाटील यांनी आठवण करून दिली की जेव्हा स्वयंसेवी गटांचे माध्यान्ह आहार कंत्राट रद्द करण्यात येत होते तेव्हा शिवसेनेने आवाज उठवल्या नंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कंत्राटांचे नूतनीकरण केले.  अक्षय पात्रा कंपनीचे गोव्यात प्रवेश अटळ असून भविष्यात स्वयंसेवी संस्थांची कंत्राटे रद्द होणार असल्याची भिती व्यक्त करून जर तसे झाल्यास शिवसेना महिला आघाडी स्वयंसेवी गटांबरोबर रस्त्यावर उतरणार असल्याचा ईशारा पाटील यांनी दिला आहे.
यावेळी प्रदेश सचिव वंदना लोबो, राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल प्रभुगावकर,  रजनी वेळुस्कर आणि विभाग प्रमुख सुरज उपस्थित होते.