अंदमान-निकोबारमधील पर्यटनस्थळे 26 मार्च 2020 पर्यंत बंद

0
833

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय

 

 

गोवा खबर:कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अंदमान आणि निकोबार प्रशासनाने आजपासून सर्व समुद्रकिनारे, इको-टूरिजम स्थळे आणि जलक्रीडा यासह सर्व पर्यटनस्थळे 26 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे निर्देश प्रशासनाने जारी केले असून या कालावधीत अंदमान-निकोबारला न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या काळात सर्व पर्यटन सुविधा बंद राहणार असून पर्यटन कंपन्यांनी त्यानुसार आपल्या ग्राहकांना सल्ला द्यावा.