यंदा इफ्फीच्या इंडियन पॅनोरमामध्ये झळकणार 6 मराठी सिनेमा

0
378
 गोवा खबर:भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचे यंदा 50 वे वर्षे आहे.यंदाच्या इफ्फीमधील इंडियन पॅनोरमात 5 मराठी चित्रपटांना स्थान मिळाले आहे.एकाही कोकणी सिनेमाची निवड पॅनोरमा मध्ये न झाल्याने गोव्यात मात्र चित्रपट प्रेमींकडून नाराजीचा सुर व्यक्त होत आहे.

इंडियन पॅनोरमा मधील फीचर फिल्म विभागात दाखवण्यासाठी निवडलेल्या 26 फीचर फिल्म मध्ये तब्बल 5 मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे.

इंडियन पॅनोरमाच्या फीचर फिल्म विभागात सुजय सुनील दहाके दिग्दर्शित तुझ्या आयला, समीर संजय विध्वंस दिग्दर्शित आनंदी गोपाळ, शिवजी लोटन पाटील दिग्दर्शित भोंगा, अनंत नारायण महदेवन दिग्दर्शित माई घाट:क्राइम नंबर 103/2005 तसेच आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित फोटो प्रेम या सिनेमांचा समावेश आहे.

त्याशिवाय नॉन फीचर फिल्म विभागात 15 पैकी फक्त गणेश शिवजी शेलार दिग्दर्शित गढुळ या एकाच सिनेमाचा समावेश आहे.
गोव्यात इफ्फी आयोजित होत असून देखील एकाही कोकणी सिनेमाची निवड इंडियन पॅनोरमा मध्ये न झाल्याने कोकणी चित्रपट निर्माते नाराजीचा सुर व्यक्त करत आहे.विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून कोकणी चित्रपट निर्मात्यांवरील अन्याय दूर केला नाही तर इफ्फी दरम्यान आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.