गोव्यात फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा सोशल मीडियावर धुमाकुळ

0
629
गोवा खबर:सोशल मीडियावर प्राणी विविध करामती करतानाचे व्हिडिओ नेहमी झळकत असतात.फुटबॉल हा राज्य खेळ असलेल्या गोव्यात फुटबॉल खेळणाऱ्या एका गायीने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

संपुर्ण देशावर सध्या क्रिकेटचा ज्वर चढला आहे. फुटबॉल वेड्या गोव्यात देखील अशीच परिस्थिती असली तरी फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या गायी मुळे गोमंतकीयांचे पाय मात्र फुटबॉल मैदानाकडे वळू लागले आहेत.
 रिमझिम पावसात काही फुटबॉलपटू म्हार्दोळ येथील  मैदानावर फुटबॉलचा आनंद लूटत असताना एक फुटबॉलवेडी गाय फुटबॉल घेऊन चक्क अडून बसली होती.त्यांतर तो फुटबॉल मिळवण्यासाठी उडालेली धमाल खेळाडूपैकी काहीनी चित्रित करून सेशलमिडीयावर टाकल्या नंतर त्या व्हिडिओने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे.

 पणजी फोंडा महामार्गावरील म्हार्दोळ येथील रस्त्याच्या शेजारी असलेल्या मैदानावर गायीने फुटबॉल मध्ये जबरदस्त फुटवर्कचे घडवलेले दर्शन सगळ्यांचे डोळे थक्क करत आहे.
  शुभम म्हार्दोळकर याने गमंत म्हणून केलेले  चित्रीकरण सध्या जबरदस्त व्हायरल झाले आहे.
पुर्वी मंदीरांसाठी प्रसिद्ध असलेला म्हार्दोळ मंगेशी हा परीसर सध्या गायीने मैदानावर रोनाल्डोचा अवतार घेतल्यामुळे प्रसिद्ध झाला आहे.  सध्या गल्ली ते दिल्लीपासून चर्चा आहे ती म्हार्दोळचीच. गायीने आपले फुटबॉलप्रेम चक्क फुटबॉल मैदानावर उतरून जाहीर केले आहे. आज या व्हिडिओला युटय़ुब, वॉटसऍप्, ट्टिरवर हजारो लाईकस प्राप्त झाले आहे.
 गोमाता की जय, रोनाल्डो-मेस्सीला स्पर्धा करतेय आमची गोमाता, त्याशिवाय  क्रिकेट समीक्षक हर्ष भोगले यांनीही आपल्या ट्व्टिरवरून मजेशीर व्हिडिओ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी सोमवार व मंगळवारी व्हॉटस्ऍप स्टेटस ठेवून सदर व्हिडिओचा प्रसार केला आहे. त्यामुळे म्हार्दोळचे फुटबॉल प्रेम राष्ट्रीय पातळीवर धुमाकूळ घालत आहे.