गोवा खबर:कॅसिनो प्राइड ग्रुप तर्फे चालवल्या जात असलेल्या कॅसिनो प्राइड 2 या नुतनीकरण केलेल्या कॅसिनो जहाजाचे 24 मे रोजी भव्य उद्धाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कॅसिनो प्राइड 2 साठी नवीन आलीशान बोट पणजी येथील मांडवी नदित दाखल झाली आहे.कॅसिनो प्राइड 2 च्या बोटीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सध्या हा कॅसिनो सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
कॅसिनो प्राइड 2 चे दणक्यात उद्धाटन केले जाणार आहे.यानिमित्त 24,25 आणि 26 मे रोजी झुंबास्टिक मनोरंजनाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.अनेक दिग्गज कलाकार यावेळी हजेरी लावून आपली कला सादर करणार आहेत.
कॅसिनो प्राइड 1 आणि कॅसिनो प्राइड 2 हे दोन्ही तरंगते कॅसिनो दर्जा आणि विश्वासार्हतेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.