आयएनएस विक्रमादित्य नौकेवर आग,नौदलाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू

0
767

गोवा खबर:आयएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलाची नौका आज सकाळी कारवार बंदरात प्रवेश करत असताना तिला आग लागली. जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित हालचाली करत आग आटोक्यात आणल्यामुळे जहाजाचे कोणतेही नुकसान झाले नाही.
लेफ्टनंट कमांडर डी. एस. चोहान यांच्या नेतृत्वाखाली चमुने आग विझवली. मात्र,आगीमुळे पसरलेल्या धुराचा त्रास होऊन लेफ्टनंट कमांडर डी. एस. चोहान बेशुद्ध झाले. त्यांना कारवार येथील आएनएचएस पतंजली या नौदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.