श्रीपाद नाईक उद्या वाळपई मतदारसंघ दौऱ्यावर

0
323
गोवा खबर:उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार श्रीपाद नाईक सोमवारी सकाळी ९.३०. वाजता वाळपईचे आराध्य दैवत श्री हनुमान मंदीरात श्रींचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार आहेत.आरोग्यमंत्री विश्वजीत राणे त्यांच्या समवेत प्रचारात सहभागी होणार आहेत.
श्रीपाद नाईक यांनी आज पर्ये मतदारसंघाचा दौरा करून प्रचार केला.मतदारांच्या गाठीभेटी आणि स्थानिक देवतांचे आशीर्वाद घेऊन गेल्या 20 वर्षात केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून यावेळी देखील विजयी होईन असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचरात सहभागी झाले होते.
सकाळी १० वाजता नगरगाव  सरपंच सौ लक्ष्मी हरवळकर यांच्या निवासस्थानी पंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्या नंतर सकाळी ११. वाजता सावर्डे पंचायत क्षेत्रात  कुमठळ  येथे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
दुपारी १२.१५ खोतोडे सरपंच ओम प्रकाश बर्वे यांच्या निवासस्थानी पंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांची संवाद.
दुपारी १२.४५ वाजता जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे यांच्या निवासस्थानी गुळेली पंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संवाद.
दुपारी दीड वाजता भोजनोत्तर नगरसेवक अनिल काटकर, वेळूस यांच्या निवासस्थानी बैठक.
दुपारी ३.३०  वाजता गांजे येथील देविदास गावकर यांच्या निवासस्थानी संवाद बैठक.
सायंकाळी ४.३० वाजता उसगाव सरपंच अस्मिता गावडे यांच्या निवासस्थानी  बैठक.
सायंकाळी ५ .३० वाजता पंच सदस्य तुळशीदास प्रभू यांच्या गावकरवाडा उजगाव येथील निवासस्थानी कार्यकर्ता बैठक.
सायंकाळी ६.वाजता पंच सदस्य सौ .मनीषा उसगावकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता संवाद बैठक.
सायंकाळी ६.३० वाजता उपसरपंच श्री रामनाथ डांगी यांच्या तिस्क उसगाव येथील निवासस्थानी बैठक.
सायंकाळी सात वाजता मा. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या उजगाव तीस्क येथील कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधून वाळपई मतदार संघा मधील प्रचाराची सांगता करणार आहेत.