आयसीएआरचा 43 वा वर्धापनदिन साजरा

0
2322

 

गोवा खबर:भारतीय कृषी संशोधन संस्थेचा 43 वा वर्धापनदिन मंगळवारी साजरा करण्यात आला. संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाचे संचालक माधव केळकर, पशुवैद्यकीय विभागाचे संचालक डॉ संतोष देसाई यांची उपस्थिती होती.

आयसीएआरचे संचालक डॉ ई बी चाकूरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही गौरवण्यात आले.