गोवा खबर:महाराष्ट्रात भाजप सोबत युती असली तरी गोव्यात शिवसेना भाजप विरोधात लोकसभेच्या दोन्ही निवडणुका लढवणार असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेच्या वतीने उत्तर गोव्यातून राज्यप्रमुख जितेश कामत तर दक्षिण गोव्यातून उपराज्यप्रमुख राखी प्रभूदेसाई नाईक निवडणूक लढवणार असल्याची माहिती,खासदार राऊत यांनी दिली.
गोव्यात लोकसभे बरोबर विधानसभेच्या 3 पोटनिवडणुका होत असून त्यातील मांद्रेची पोटनिवडणुक शिवसेना लढवणार असून तेथील उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल, असे राऊत म्हणाले.
गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेनेने सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंच सोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या.यावेळी गोवा सुरक्षा मंचने तिन्ही पोटनिवडणुकांचे उमेदवार जाहीर केले आहेत.असे असले तरी शिवसेनेचे दरवाजे चर्चेसाठी खुले असून आज किंवा उद्या वेलिंगकर यांच्याशी चर्चा करून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here