2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे प्राप्तीकर कार्यालयाचे आवाहन

0
435

 

 

गोवा खबर:2019 च्या सार्वत्रिक निवडणुकात काळ्या पैशाचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तीकर विभागाच्या तपास महासंचालनालयाने मुंबईत अहोरात्र नियंत्रण कक्ष उभारला आहे.

मुंबईतल्या मतदार संघांत निवडणुकीवर प्रभाव टाकू शकणारी रोकड, मौल्यवान वस्तू आणि इतर अवैध साधनांच्या हालचालींबाबत प्राप्तीकर कायद्याअंतर्गत, योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने प्राप्तीकर महासंचालनालय (तपास) कार्यालय कडक नजर ठेवत असून या संदर्भात गुप्त माहितीही गोळा करत आहे.

निवडणुकीसाठी काळ्या पैशाच्या वापराबाबत माहिती किंवा तक्रार नोंदवण्यासाठी 1800-221-510 या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधता येईल. 022-22820562 या लॅन्डलाईन दूरध्वनीवर किंवा 9372727823 आणि 9372727824 या व्हॉट्‌सॲप क्रमांकाद्वारेही माहिती देता येईल.

मुक्त आणि नि:पक्ष निवडणुकांसाठी आणि निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर होऊ नये यासाठी दक्ष नागरिकांनी काळा पैसा, सोने, चांदी यांची साठवणूक आणि वितरण याबाबतची माहिती दक्ष नागरिकांनी संबंधित दूरध्वनी क्रमांकावर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.