राज्यात आज जागतिक ग्राहक हक्क दिन

0
88

 

गोवा खबर:नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने आज  १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता पाटो पणजी येथील कला व संस्कृती संचालनालयाच्या, संस्कृती भवनातील, बहुउद्देशीय सभागृहामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिनाचे आयोजन केले आहे.

         “ट्रस्टेड स्मार्ट प्रॉडक्टस्”(विश्वसनिय स्मार्ट उत्पादने) हे यंदाच्या जागतिक ग्राहक हक्क दिनाचा विषय आहेव्ही.एम्. साळगांवकर कायदा महाविद्यालयाच्या कन्झ्युमर क्लिनिकचे संचालक डॉ. शबीर अली यांच्या बिजभाषणानंतर अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय, वजन आणि माप खाते, भारतीय मानक ब्युरो आणि एलपीजी ग्राहक व्यवहार यांच्या अधिकार्‍यांतर्फे चर्चासत्र होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here