दृष्टीदोष असलेल्या मतदारांसाठी २० मार्च रोजी जागृती सत्र

0
159

 गोवा खबर: दृष्टीदोष असलेल्या मतदारांसाठी दि. २० मार्च रोजी सकाळी १० वाजता पाटो पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या तळमजल्यावरील बहुउद्देशीय सभागृहामध्ये जागृती सत्र होणार असल्याचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

     २३ एप्रिल २०१९ रोजी उत्तर गोवा सांसदिय मतदारसंघात होणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये अंध आणि कमी दृष्टी असलेल्या मतदारांना मतदान प्रक्रिया आणि सुविधेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी हे जागृती सत्र आयोजित करण्यात आले आहे.

         दृष्टीदोष असलेले मतदार, एनजीओ आणि इतर संबंधितांनी वरील दिवशी वर सागितलेल्या  ठिकाणी वेळेत हजर रहावे असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here