श्रीपाद नाईकांच्या प्रचाराचा प्रियोळात नारळ फुटला 

0
417

 

 

गोवा खबर:२३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील खासदारकीच्या उमेदवारांमध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात झाली असून उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनी प्रियोळ मतदार संघातून कार्यकर्ते, प्रमुख  मतदारांच्या भेटी घेण्यास प्रारंभ केला आहे.

काल गुरुवार १४ मार्च रोजी सकाळी वाजता म्हार्दोळ येथील म्हाळसा देवीच्या मंदिरात देवीच्या दर्शनाने व देवीला नारळ ठेवून प्रचारास सुरुवात झाली आहे. देवीचा कौल घेऊन श्रीपाद नाईक यांनी म्हार्दोळ येथील कार्यकर्ते, मतदारांच्या भेटी घेतल्या. फुलकार समाज, वेलिंग येथील शांतादुर्गा देवस्थान, प्रियोळ पंचायत परिसर, मंगेशी, कुंकळ्ये, भोमा, अडकोण–बाणस्तारी येथे कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या पहिल्या सत्रात भेटी घेतल्या. दुसऱ्या सत्रात श्रीराम देवस्थान, श्री सातेरी देवस्थान, सावईवेरे, वाघुर्मे, वळवई, फोंडचेभाट, सातेरीभाट, मार्शेल, बेतकी – खांडोळा येथे परिसरात अनेकांच्या भेटी घेण्यात आल्या. या दौऱ्यात सर्व कार्यकर्ते आणि मतदारांनी संपूर्ण पाठिंबा दर्शविला असून पहिलाच दौरा यशस्वी ठरला आहे.

या दौऱ्यात श्रीपाद नाईक यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. विजया नाईक, संयोजक गोविंद पर्वतकर, सहसंयोजक सुखाजी नाईक, प्रभारी म्हणून माजी आमदार दामू नाईक, विस्तारक प्रमुख गोरख मांद्रेकर तसेच स्थानिक सरपंच, पंचायत मंडळ, प्रमुख कार्यकर्ते, मतदार प्रचाराच्या कार्यात सहभागी होते.