ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

0
233

 

गोवा खबर: तिसवाडी तालुक्यातील ताळगाव ग्रामपंचायतीच्या ११ वार्डांसाठी २८ एप्रिल २०१९ रोजी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे.

 या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून तिसवाडीच्या मामलतदारांची नेमणूक करण्यात आली आहे. रविवार  १४ एप्रिल २०१९ वगळता, ८ एप्रिल २०१९ ते १५ एप्रिल २०१९ या दिवसांत सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.  उमेदवारी अर्जांची छाननी १६ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.  १७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

         २८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत मतदान घेण्यात येईल आणि मतमोजणी  २९ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ८ ते मतमोजणी संपेपर्यंत होईल.

        निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेतली जाईल. सर्वसामान्य जागेसाठी रू. १००/- आणि जर जागा स्त्रियांसाठी राखीव किंवा उमेदवार अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागास वर्गातील असल्यास रू. ५०/- निवडणूक अधिकार्‍याकडे जमा करावे लागतील. उमेदवारी अर्ज कार्यालयीन वेळेत निवडणूक अधिकारी/मामलतदारांकडे उपलब्ध असतील.