अमेरिकेच्या भारतातील राजदूताची राजभवनला भेट

0
171

  गोवा खबर: अमेरिकेचे भारतातील राजदूत  केनेथ आय. जस्टर यांनी आज दोनापावला येथील राजभवनला सदिच्छा भेट दिली. यावेळी गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी  जस्टर यांचे स्वागत केले.या भेटीवेळी राज्यपालांनी जस्टर यांना गोव्यातील आर्थिक विकास, सामाजिक सलोखा आणि कला आणि संस्कृती यांच्याशी संबधित विविध विषयांवर माहिती दिली.

      जस्टर यांनी राजभवनाच्या इमारतीची बारकाईने पाहणी केली तसेच इमारतीची वास्तुकला आणि सौदर्य पाहून खूप प्रभावित झाले. संयुक्त राष्ट्राचे राजदूताने राज्यपालांकडून राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाचीही माहिती करून घेतली.

 

     जस्टर यांनी राज्यपाल डॉ. सिन्हा यांचे हिंदी साहित्य क्षेत्रातील योगदान आणि समाज कार्याची खूप प्रशंसा केली. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबईचे कोन्सूल जनरल   एडगर डी केगन व इतर अधिकारी उपस्थित होते.

     राज्यपालांचे सचिव रूपेश कुमार ठाकूर, राज्यपालांचे एडीसी राजवीर सिंग राठोड,  विश्राम बोरकर, संयुक्त सचिव  बिजू नाईक आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here