सचिनने गोव्यात अनुभवला बॅड रोड बडीजचा थरार

0
342
गोवा खबर:आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झालेला मास्टर ब्लास्टर सध्या ऑफ रोड कार रेसिंगमध्ये जोरदार फटकेबाजी करु लागला आहे.गोव्यात रविवारी अपोलो टायर्स तर्फे आयोजित बॅड रोड बडीजच्या समारोप सोहळयाला सचिनने फक्त हजेरी लावली नाही तर मैदानात उतरून त्याने चढ उतार पार करत आपण या खेळात देखील मास्टर ब्लास्टर होऊ शकतो याचे संकेत दिले.

सचिनचे गाडयांचे प्रेम सर्वश्रुत आहे.गोव्यात यापूर्वी कार्ट रेसिंग ट्रॅकवर सचिन चौफेर फटकेबाजी करताना दिसला होता.सचिनने आपली ऑफ रोड रेसिंग मध्ये कार चालवण्याची हौस विदेशात भागवली होती.देशात पहिल्यांदाच रविवारी गोव्यात ऑफ रोड रेसिंग साठी मैदानात उतरला.
दक्षिण गोव्यातील केपे येथील पठारावर नैसर्गिक ट्रैकवर सचिन कार घेऊन मैदानात उतरला आणि त्याने आपले लक्ष्य साध्य करून सगळ्यांना चकित केले.त्यानंतर सहचालक बनून सचिनने आणखी एक थरार अनुभवला जो प्रशिक्षित ऑफ रोड रेसर्सस करतात.एका चीरेखाणीत खास नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खडयात कार उतरवून ती बाहेर काढण्याचा अनुभव ग्रेट होता असे सचिनने  सांगितले.सचिनने बॅड रोड बडीजशी संवाद साधताना बॅड रोड बडीज हे चांगले चालक असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here