प्रसिद्ध साहित्यिक माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांचे निधन

0
305
 गोवा खबर: ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी उपसभापती विष्णू वाघ यांचे  8 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत निधन झाले. वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी यासंदर्भातील माहिती केपटाउन येथून दिली आहे. वाघ हे ऑगस्ट 2016 पासून हृदयविकारामुळे आजारी होते.  मृत्यूसमयी वाघ यांचे वय 53 वर्षे होते.

वाघ हे 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून येऊन प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. उपसभापतीपदी असताना वाघ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यावेळपासून ते व्हिलचेअरला खिळून होते.

वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी दिलेल्या माहिती नुसार दोन महिने वाघ हे दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात होते. ते वारंवार आजारी होऊ लागल्याने त्यांच्याच इच्छेनुसार केपटाऊन, जोहान्सबर्ग येथे त्यांना आपण नेले होते. तिथे त्यांना आराम मिळाला होता; पण 8 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. येत्या दोन दिवसांत त्यांचा मृतदेह गोव्यात आणून अंत्यसंस्कार केले जातील.
वाघ यांच्या निधनाब्द्द्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर,आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह वाघ यांच्या असंख्य चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here