तर खाजगी बस मालक संघटना सरकार विरोधात प्रचार करणार-ताम्हणकर

0
133
गोवा खबर: अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी  11 फेब्रुवारी रोजी जुन्ता हाऊसमधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयासमोर धरणे धरणार असल्याचा इशारा दिला आहे.त्याच बरोबर मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा पोट निवडणुकीत मांद्रे आणि शिरोडा या दोन्ही मतदारसंघात सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराविरोधात काम करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे भाजपची डोकेदुखी आणखीच वाढली आहे.
संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सरकारी कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ‘गेले दीड वर्ष सरकारकडे बसमालकांच्या अनेक मागण्या पडून आहेत. वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई हे केवळ आश्वासने देतात, त्यापलीकडे काहीच करत नाहीत. सरकारने अलीकडे दिलेली तिकीट दरवाढ अन्यायकारक आहे. 12 किलोमीटर तसेच 18 किलोमीटर पल्ल्याच्या छोट्या मार्गावर खासगी बसमालकांना कोणताही फायदा झालेला नाही.
खासगी आणि कदंब बस गाड्यांच्या वेळापत्रकात ताळमेळ असावा तसेच संघर्ष होऊ नये यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली. परंतु या समितीच्या केवळ दोनच बैठका झालेल्या आहेत. प्रत्येक बस स्थानकावर प्रमाणित वेळ दर्शवणारी घड्याळे लावण्याची विनंती करूनही ती पूर्ण झालेली नाही. सरकारच्या दोन योजना आहेत तसेच सबसिडी योजना आहे परंतु बस मालकांना याचा कोणताही लाभ 2014 पासून झालेला नाही. बँकांचे हप्ते थकले आहेत. तिकीट दरवाढीत संचालक देसाई यांनी जाणूनबुजून घातलेला आहे असा आरोपही ताम्हणकर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here