होमिओपथी औषधींच्या आयात-निर्यातीसाठी नव्या संधी निर्माण करणे गरजेचे-श्रीपाद नाईक

0
435

तीन दिवसीय जागतिक होमिओपथी परिषदेचा समारोप

 

गोवा खबर:भारतीय होमिओपथी औषधांना जगभर चांगली मागणी आहे. पण, होमिओपथी क्षेत्रासमोर व्यावसायिकदृष्टया संधी कमी आहेत. त्यामुळे नव्या संधी निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले. ते आज तीन दिवसीय जागतिक होमिओपथी परिषदेच्या समारोपाप्रसंगी बोलत होते. राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

भारत आयुष उपचापद्धतींना महत्त्व देतो, त्यामुळेच अशाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात भारताचा पुढाकार आहे. जरी होमिओपथीचा उगम जर्मनीतला असला तरी भारतात होमिओपथी उपचारपद्धती लोकप्रिय आहे. तसेच बाजारपेठेतही होमिओपथीचे अस्तित्व ठळकपणे दिसून येते.

होमिओपथीच्या आणखी विकासासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि नियामक मंडळांनी पुढे येण्याची गरज असल्याचे श्रीपाद नाईक यावेळी म्हणाले. अशाप्रकारच्या परिषदांमुळे होमिओपथीसमोर असलेल्या आव्हांनाचा अभ्यास करुन पुढे जाता येते. या परिषदेनंतर होमिओपथी केवळ लोकप्रियच नाही तर नियंत्रितही होईल, असे श्री नाईक म्हणाले.

होमिओपथीचे कोणतेही दुष्परिणाम नाहती. तसेच यामुळे औषधांचा कमीत कमी वापर करता येईल, असे राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा म्हणाल्या.

 

तीन दिवसीय जागतिक होमिओपथी परिषदेसाठी जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, ब्राझील, बेल्जिअम, दक्षिण आफ्रिका,अर्जेन्टीना, रशिया, ग्रीस, ऑस्ट्रीया, क्यूबा, कतार, क्रोएशिया, मलेशिया, जपान, हाँगकाँग आणि श्रीलंका या देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here