केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या खासदार निधीतून अनेक लोकोपयोगी कामे

0
678

 

गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या खासदार निधीमधून खर्च करून अनेक लोकोपयोगी कामांचे आज लोकार्पण करण्यात आले.

 

यामध्ये सर्वप्रथम पर्यटन भवन येथे दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी स्वयंचलित वाहने देण्यात आली. यावेळी अधिक माहिती देताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, आत्तापर्यंत 18 दिव्यांग नागरीकांना अशी वाहने देण्यात आली आहेत; ज्यापैकी चार व्यक्ती आज प्रत्यक्ष उपस्थित होत्या. दिव्यांग व्यक्तींना सुखकर आयुष्य जगता यावे, कामानिमित्त कुठेही फिरताना सोय व्हावी आणि त्रास कमी व्हावा, हीच भावना या मदतीमागे आहे, असे ते म्हणाले

 यानंतरही कोणाला अशी मदत हवी असल्यास संपर्क करावा, असे आवाहनही नाईक यांनी याप्रसंगी केले आहे.

त्यांनतर नाईक यांनी शिरोडवाडी, मुळगाव येथील सरकारी शाळेला तसेच कोळवळे, बार्देज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेला संगणक व इतर कार्यालयीन सामान देण्यात आले.

 

यानंतर बार्देश मधीलच रेवोडा ग्रामपंचायतीला एक शव वाहिनी नाईक यांनी भेट दिली. पेडण्यातील तोरसे येथील सरकारी शाळेसाठी उभ्या केलेल्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन देखील केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज केले.