प्रयागराज मध्ये कुंभमेळयाची जय्यत तयारी सुरु,15 कोटी भाविक लावणार हजेरी

0
1378
गोवा खबर:उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 15 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कुंभमेळयाला यंदा 15 कोटी भाविकांची उपस्थिती लाभेल. उत्तर प्रदेश सरकारने या मेळयाची जय्यत तयारी केली असून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूकमंत्री नंदगोपाल गुप्ता यांनी दिली.
प्रयागराज येथे 15 जानेवारी ते 4 मार्च या कालावधीत हा कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळयाची तयारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मागील दीड वर्षापासूनच सुरु केली आहे. भव्य कुंभमेळयाचे आयोजन करण्यावर सरकारने भर दिला आहे. 3200 हेक्टर भागात कुंभमेळयाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच कुंभमेळयाचा लोगो तयार करण्यात आला आहे. युनोस्कोने या मेळयाला  सांस्कृतिक सोहळा म्हणून मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
नवीन विमानतळासह अन्य अनेक महत्वपूर्ण सुविधा या मेळयासाठी तयार करण्यात आल्या आहेत. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आयोजन कसे असावे याबाबत सूचना केल्या आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचेही सहकार्य या मेळयास लाभले आहे. 15 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी कुंभ मेळयाला सुरुवात होणार आहे. 4 फेब्रुवारीला शाही स्नान होणार आहे. 4 मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी मेळयाची सांगता होणार आहे. 49 दिवस कुंभमेळा चालणार आहे. पारंपरिकता आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा यावेळी संगम दिसून येणार आहे. केंद्र सरकारची पाच खाती आणि उत्तर प्रदेश सरकारच्या अनेक खात्यांचा यामध्ये सहभाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here