मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप आमदारांची बैठक

0
2313
 गोवा खबर: दिल्ली येथील एम्स मध्ये उपचार घेऊन आल्यापासून आपल्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानाहुन सरकारी कारभार हाकत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज दुपारी साडेतीन वाजता प्रथमच भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत.
पर्रीकर यांना सध्याच्या घडीला घराबाहेर पडणे त्यांना तूर्त शक्य नाही. त्यामुळे ते पर्वरीतील सचिवालयातही येऊ शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी उपेंद्र जोशी हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतात.
मुख्यमंत्री गेल्या आठवड्यात म्हणजे इफ्फी संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेऊ पाहत होते. मात्र काही मंत्री गोव्या बाहेर असल्याने मंत्रिमंडळ बैठक घेतली गेली नाही, असे सांगितले जाते.
 भाजापच्या सर्व आमदारांना पर्रीकर अलिकडे आपल्या खासगी निवासस्थानी भेटले नव्हते. शनिवारी आमदारांना बोलवण्यात आले आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. प्रशासन ठप्प झाल्याची टीका काही मंत्री, आमदार सातत्याने करत असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठका होत आहेत.
मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री विजय सरदेसाई भेटले. तासभर सरदेसाई मुख्यमंत्र्यांशी बोलले. पर्रिकर यांना भेटून आल्या नंतर सरदेसाई यांनी आपण भेटलो तेव्हा पर्रीकर टीव्हीवर  सिनेमा पाहत होते,असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. काही प्रशासकीय कामांविषयी मी पर्रीकरांशी बोललो. ते मला बौद्धीकदृष्टय़ा तरी चांगल्या स्थितीत दिसले. ते घरातूनच काम करत असल्याने विद्यमान मुख्यमंत्री बदलला जावा ही मागणी मला योग्य वाटत नाही. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न येत नाही. माझा पक्ष तरी दुस:या कोणत्या पक्षासोबत जाणार नाही, कारण पर्रीकर घरातून काम करतात, असे देखील सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here