शाजी एन करुण दिग्दर्शित ‘ओलू’ या मल्याळम चित्रपटाने होणार इंडियन पॅनोरमाची सुरुवात

0
366

49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2018 साठी इंडियन पॅनोरमा चित्रपट जाहीर 

गोवा खबर :49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2018 मधे इंडियन पॅनोरमा विभागात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांची निवड जाहीर करण्यात आली आहे. 22 कथाधारित चित्रपटांची निवड करण्यात आली असून शाजी एन करुण दिग्दर्शित ‘ओलू’ या मल्याळम चित्रपटाने इंडियन पॅनोरमाची सुरुवात होणार आहे.

या 22 चित्रपटात ‘धप्पा’ या निपूण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित तसेच ‘आम्ही दोघी’ या प्रतिमा जोशी दिग्दर्शित मराठी चित्रपटांचा समावेश आहे. कथाबाह्य इंडियन पॅनोरमा चित्रपट विभागासाठी 21 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘खरवस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने या विभागाचा प्रारंभ होणार आहे. ‘हॅपी बर्थ डे’, ‘ना बोले वो हराम’, ‘सायलेंट स्क्रीम’, ‘येस आय ॲम माऊली’ ‘पाम्पलेट’, ‘आई शपथ’, ‘भर दुपारी’ या चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे.

चित्रपट दिग्दर्शक राहूल रवेल यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांच्या फिचर फिल्म ज्यूरींनी इंडियन पॅनोरमासाठी चित्रपटांची निवड केली आहे.