व्हीएमएसआयआयएचईतर्फे प्रतिष्ठित आचारी पुरस्कार 2018

0
1786

 

 

गोवा खबर:प्रतिष्ठित आचारी पुरस्कार 2018 हा व्ही.एम. साळगावकर आंतररष्ट्रीय आतिथ्य शिक्षण संस्था (व्हीएमएसआयआयएचई) येथे होणार आहे. या कार्यक्रमात देशांतील विविध भागांतील आचारी अंतिम फेरीसाठी व पुरस्कारासाठी गोव्यात येणार आहे. व्हीएमएसआयआयएचई ही देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था आहे.

वार्षिक भारतीय आचारी पुरस्कारासाठी मुंबई, बंगळुरु, चेन्नई, कोची, कोलकाता, दिल्ली/एनसीआर व अहमदाबाद येथून निवड प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अंतिम फेरी ही 25 ऑक्टोबर रोजी गोव्यातील व्हीएमएसआयआयएचई येथे होणार आहे. त्यानंतर त्यानंतर व्हीएमएसआयआयएचईमध्येच 27 ऑक्टोबर रोजी पुरस्कार मानकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सर्व स्पर्धक हे उद्यानातील सर्वोत्कृष्ट आचाऱ्यांविरुध्द लढणार आहेत. त्यांना विविध निकषांवर निवडण्यात येणार आहे.

सेलिब्रिटी आचारी हेमंत ऑबरोय हे या कार्यक्रमाचे संचलन (मॉनिटर) करणार आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी या उद्यानात घालवला आहे. आचारी हेमंत ऑबरॉय हे सर्वोच्च मानांकित आचाऱ्यांपैकी आहे. त्यांनी राष्ट्रपती क्लिंटन व राष्ट्रपती ओबामा, बच्चन, हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझ व इतर यांच्यासाठी क्युरेटिड मिल केले आहेत.

आचारी हेमंत ऑबरॉय, आचारी उर्बानो दो रेगो, आचारी विनित मानोचा, आचारी सुनील सोनी, आचारी क्लिमंट डिक्रुझ हे परिक्षक असणार आहेत.

वर्षातील भारतीय आचारी पुरस्काराच्या विजेत्याला रोख रक्कम 2 लाख रुपये तर भारतीय आचारी टीम इव्हेंट विजेत्याला रोख रक्कम 1 लाख रुपये व भारतीय आचारी वैयक्तिक श्रेणीतील विजेत्याला प्रत्येकी 50 हजार रुपये मिळणार आहेत.

“व्हीएमएसआयआयएचईच्या विद्यार्थी, फॅकल्टी व स्टाफसाठी अभिमानाची गोष्ट आहे कि भारतीय आचारी पुरस्कार 2018चे यजमानपद आम्ही स्वीकारले आहे. याशिवाय देशातील अग्रगण्य आचारी गोव्यात येणार आहे. आम्ही आमच्या संस्थेत जागतिक दर्जाचे आतिथ्य शिक्षण प्रदान करतो. या कार्यक्रमामुळे आम्च्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल याची अशी मी आशा करतो.” व्हीएमएसआयआयएचईचे संचालक व प्राचार्य प्रा.इरफान मिर्झा यांनी म्हटले.