गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास सारखे

0
395
गोवा खबर:केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यामुळे गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास सारखे झाले आहेत.आज पेट्रोलचा दर 72.59 पैसे प्रति लीटर तर तर डिझेलचा दर 71.94 पैसे प्रति लीटर इतका झाला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारने दर कपात करण्या पूर्वी 4 ऑक्टोबर रोजी गोव्यात पेट्रोल 77 रुपये 21 पैसे तर डिझेल 76 रुपये 63 पैसे दराने विकले जात होते.केंद्राने अडीच रुपये कमी केल्या नंतर 5 ऑक्टोबरला पेट्रोल 74 रुपये 90 पैसे तर डिझेल 74 रुपये 7 पैसे झाले.
केंद्राने अडीच रुपये कमी करताच गोव्याने डिझेल आणि पेट्रोल वरील वॅट 4 टक्केनी कमी केला. त्याची अधिसूचना 4 तारीखला काढली गेली नाही त्यामुळे 5 तारीखला केंद्र आणि राज्य यांच्या एकत्रित दर कपातीचा फायदा गोव्यातील लोकांना मिळू शकला नाही.
गोवा सरकारने काल अधिसूचना काढल्याने काल मध्यरात्री पासून लागू झालेल्या नव्या दरां नुसार पेट्रोल 4 रुपये 62 पैशांनी तर डिझेल 4 रुपये 69 पैशांनी स्वस्त झाले आहे. केंद्र आणि राज्य यांनी दर कपात केल्या नंतर पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होईल असा अंदाज होता मात्र दर कपाती नंतर देखील स्वस्ताई 5 रुपयांचा आकडा गाठु शकली नाही.गोवा सरकारने वॅट 4 टक्के कमी केल्याने सरकारला दरमहा 5 कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here