शिक्षक हे देशाच्या विकासाचे रचनाकार-उपराष्ट्रपती

0
949
The Prime Minister, Shri Narendra Modi with the awardees of the National Teachers’ Awards, on the eve of Teachers’ Day, in New Delhi on September 04, 2018. The Union Minister for Human Resource Development, Shri Prakash Javadekar is also seen.

शिक्षक दिनानिमित्त उपराष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

 

 

 

गोवा खबर:शिक्षक हे देशाच्या विकासाचे रचनाकार आहेत, असे गौरवोद्गार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी काढले. 2017 वर्षासाठीचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्या समारंभात ते बोलत होते. मूलभूत शिक्षण हे मातृभाषेतच दिले जावे, असे आग्रही मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.

पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करत, अशा शिक्षकांमुळे देशातील शिक्षण व्यवस्था उत्कृष्टतेकडे वाटचाल करत असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. ज्ञानदानाच्या कामाप्रती आपली वचनबद्धता आणि समर्पणामुळे आपले मार्गदर्शन प्राप्त झालेले विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवीन शिखरे गाठत असतात. जगातील अनेक देश भारताला विश्वगुरू मानतात, असेही उपराष्ट्रपती म्हणाले. गेल्या काही काळात बालके, युवक आणि इतर वयोगटातील व्यक्तींना दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यात अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागत आहे. शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलण्याची आवश्यकता उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केली. समानता, लोकशाही, शांतता आणि एकत्रित काम करण्याची वृत्ती शिक्षकांच्या आचरणातून विद्यार्थ्यांच्या अंगी बाणली जाते, हे लक्षात ठेऊन शिक्षकांनी अनुरूप वर्तन करावे, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

या समारंभात उपराष्ट्रपतींनी 2017 या वर्षासाठी देशभरातील 45 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले. या समारंभाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

***