नेहरुं ऐवजी जिना पंतप्रधान झाले असते तर भारत पाकिस्तान फाळणी झाली नसती  – दलाई लामा

0
1068
गोवा खबर : महात्मा गांधी यांच्या इच्छेनुसार  मोहम्मद अली जिना देशाचे पंतप्रधान झाले असते तर भारत-पाकिस्तानची फाळणी झाली नसती. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरु यांना ते मान्य नव्हते, असे वक्तव्य तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनीआज गोवा येथील कार्यक्रमात बोलताना केले.

उत्तर गोव्यातील साखळी येथील गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आधुनिक भारताचे पारंपारिक ज्ञान या विषयावर व्याख्यान देण्यासाठी दलाई लामा आले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थांशी संवाद साधला. ते म्हणाले, महात्मा गांधी यांना वाटत होते की, मोहम्मद अली जिना देशाचे पंतप्रधान व्हावे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ते मान्य नव्हते. ते आत्मकेंद्रीत होते. त्यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी महात्मा गांधी यांनी नेहरू यांना पंतप्रधान केले. त्यावेळी जिना पंतप्रधान झाले असते तर भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती. याचबरोबर, मी पंडित जवाहरलाल नेहरु यांना चांगले ओळखत होतो. ते खूप  हुशार आणि अनुभवी व्यक्ती होते, असेही दलाई लामा म्हणाले.
दरम्यान, सात वर्षानंतर दलाई लामा गोव्यात आले आहेत. गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here