राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात 29 जुलै रोजी अरुण खोपकर यांच्यासह डॉक्युमेंट्री फिल्म क्लब 

0
243

 

 

गोवा खबर:राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात 29 जुलै रोजी रविवारी चित्रपट निर्माता अरुण खोपकर यांच्यासह डॉक्युमेंट्री फिल्म क्लब या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा हा चौथा भाग आहे.

दुपारी 4 ते 6 आणि संध्याकाळी 6.30 ते रात्री 9 अशा दोन सत्रात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अरुण खोपकर यांचे पुरस्कार विजेते पाच माहितीपट यावेळी दाखविण्यात येतील. नारायण सुर्वे, फिगर ऑफ थॉट्स, संचारी,रसिकप्रिया आणि लोकप्रिया अशी या माहितीपटांची नावे आहेत. चित्रपटांसंदर्भात प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी अरुण खोपकर स्वत:ही उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधून शिक्षण पूर्ण करणारे अरुण खोपकर यांनी विविध विषयांना समर्पित चित्रपट तयार केले असून ते अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यांच्या चित्रपटांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत, त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट/ दिग्दर्शकासाठीच्या सुवर्ण कमळ पुरस्काराचा समावेश असून तब्बल तीन वेळा त्यांनी हा पुरस्कार मिळवला आहे.

चित्रपट रसिक आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या निमित्ताने पुरस्कार विजेते माहितीपट पाहण्याची मेजवानी मिळणार आहे.

भारतीय प्रेक्षकांपर्यंत मोठ्या संख्येने माहितीपट पोहोचावेत या हेतूने अरभाट फिल्म क्लब आणि आर्ट एक्सपिरिमेंट्सच्या सहयोगाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने हा उपक्रम सुरु केला आहे. लघुपट आणि माहितीपटांमधील वैविध्यपूर्ण विषय रसिकांपर्यंत पोहोचावेत आणि युवा चित्रपट निर्मात्यांना चांगले चित्रपट पाहण्याबरोबरच प्रत्येक चित्रपट निर्मात्याशी संवाद साधण्याची संधी मिळावी हा सुद्धा यामागचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here