फॉर्मेलिनवरुन सभागृहाचे कामकाज दूसऱ्यांदा स्थगित

0
436

 

पणजी:मासळी मध्ये वापरल्या जात असलेल्या फॉर्मेलिनचा विषय गंभीर असून त्यावर पहिल्यांदा चर्चा करा अशी मागणी करत काँग्रेस आमदार पुन्हा एकदा सभापतींच्या आसना समोरिल हौद्यात गेल्याने सभापती प्रमोद सावंत यांनी सभागृहाचे कामकाज दुसऱ्या वेळी 12.30 वाजे पर्यंत स्थगित केले.
फॉर्मेलिनच्या विषयाचे पडसाद आज विधानसभे उमटले.सकाळी कामकाज सुरु झाल्यानंतर
काँग्रेसने स्थगन प्रस्ताव सादर करून या विषयावर प्रथम चर्चा करावी अशी केलेली मागणी फेटाळली गेल्या नंतर काँग्रेस आमदार सभापतींच्या आसना समोरील हौद्यात गेले. त्यानंतर सभापती प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदा सभागृहाचे कामकाज 15 मिनिटे स्थगित केले. कॉलिंग अटेंशन मध्ये या विषयावर चर्चा करूया असे सभापतींचे म्हणणे होते मात्र काँग्रेस आमदार त्यावर राजी नव्हते.