अल्तीन्हो सरकारी वसाहतीमध्ये नागरिकांनी झाडे दत्तक घेऊन केले वृक्षारोपण

0
398

गोवाखबर:आर्थिक विकास महामंडळाने आज महालक्ष्मी ट्रस्ट आणि पणजी महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने अल्तीन्हो येथील सरकारी वसाहतीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबवला.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी  झाड लावून त्याचे संगोपन करण्याच्या संकल्पनेतून आजची वृक्षलागवड मोहीम राबवण्यात आली होती.
या मोहिमेत सरकारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी बेल,आंबा,चाफा, गुलमोहर,पारिजात,टिक्की,कडू लिंब आदी फळ आणि फूल झाडांची लागवड करण्यात आली.
नगरसेवक पुंडलिक राऊत देसाई यांच्या पुढाकाराने सलग दुसऱ्या वर्षी ही मोहीम राबवण्यात आली.अल्तीन्हो येथील डी, सी आणि जीआरपी सरकारी वसाहतींच्या परिसरात 20 झाडांची लागवड करण्यात आली.गेल्या वर्षी 25 झाड लावण्यात आली होती त्यातील 20 झाड जगली असून त्यांचे संगोपन संबंधीत कुटुंबीय करत आहेत.वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाला ईडीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळयेकर,नगरसेवक पुंडलिक राऊत देसाई आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here