संरक्षण क्षेत्राला सायबर धमक्यांचा सर्वाधिक धोका :संरक्षण मंत्री

0
635

​​

 

 

 गोवा खबर:संरक्षण विभागासाठी संरक्षण मंत्रालयाने सायबर सुरक्षा आराखड्याबाबत एक कार्यशाळा आयोजित केली होती. संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी या कार्यशाळेचे उद्‌घाटन केले.

संरक्षण क्षेत्राला सायबर धमक्यांचा सर्वाधिक धोका असल्यामुळे संभाव्य हल्ल्यापासून आपल्या सायबर स्पेसचे संरक्षण करणे महत्वाचे आहे, असे सितारमण म्हणाल्या. संरक्षण विभागासाठी सायबर सुरक्षा आराखडा तयार केल्याबद्दल त्यांनी संरक्षण उत्पादन विभागाचे अभिनंदन केले.

संरक्षण उत्पादन सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले की सर्व सरकारी संरक्षण कंपन्या आणि ऑर्डनन्स कारखाने माहिती तंत्रज्ञानावर अधिक प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे माहिती आणि सायबर सुरक्षा यात तडजोड केली, तर आपल्या संरक्षण दलाच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या परिणामकारकेवर प्रतिकुल परिणाम होऊ शकतात. त्यामुळे एक मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणा प्राधान्याने स्थापन करणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.