केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यान व्यापार आणि वाणिज्यिक संबंधाबाबत द्विपक्षीय चर्चा

0
655
​​

गोवा खबर:केंद्रीयवाणिज्य आणि उद्योगनागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी 10 ते 12 जून दरम्यान अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट ई लायथायझरवाणिज्य मंत्री विल्बर एल रॉस आणि कृषी मंत्री सोनी पर्ड्यु यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय व्यापार आणि वाणिज्यिक संबंध या चर्चेच्या केंद्र स्थानी होते. त्याचबरोबर दोन्ही बाजुंच्या चिंता आणि शंकांचे निरसन करण्याचे मार्ग शोधण्यावर भर देण्यात आला.

ही चर्चा सकारात्मकफलदायी ठरावी यासाठी दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी लवकरच बैठक घेणार आहेत.

अमेरिका-भारत व्यापार परिषद आणि अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाने आयोजित केलेल्या व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींच्या बैठकीला आणि इतर संबंधितांच्या बैठकीला संबोधित केले. अमेरिकेत निर्मिती केलेली नागरी हवाई वाहतुकीसाठीचीभारतीय कंपन्यांकडून झालेली खरेदीऊर्जा क्षेत्रातले वाढते सहकार्य विषद करुन वाढत्या व्यापाराची माहिती त्यांनी दिली. भारताच्या वेगवान आर्थिक विकासामुळे या आणि इतर क्षेत्रात नव्या बाजाराच्या संधी निर्माण होतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.