हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात करणी सेना तुमच्यासमवेत आहे ! – लोकेंद्रसिंह कालवी

0
508
सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा दुसरा दिवस
 

      रामनाथी (गोवा) – देशातील 14 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्‍वासन दिले होते कीपद्मावत चित्रपट प्रसारित करणार नाहीपण प्रत्यक्षात चित्रपट प्रसिद्ध झालाराणी पद्मावतीसह 16 सहस्र महिलांनी जोहारम्हणजेच धर्मासाठी प्राणत्याग केलाआम्ही त्यांचे वंशज आज अस्तित्वात असतांनाही पद्मावती झालीच नाहीअसा प्रचार करण्यात आलाआज वैचारिक क्रांतीची आवश्यकता आहे कीज्यामुळे पुढची100 वर्षे कोणीही इतिहासाची मोडतोड करू शकणार नाही आणि पद्मावतसारखा दुसरा कोणताही चित्रपट पुन्हा होता कामा नयेआपण धर्मनिरपेक्ष न होता धर्मसापेक्ष व्हायला हवेहिंदु राष्ट्र स्थापनेचे वर्ष 2023 जवळच आहेया वर्षांच्या कालावधीत काय करायचेयाची दिशा ठरवून ते स्थापन करूयात्यात आपण प्रत्येकाने स्वतःचा सहभाग द्यायला हवाहिंदु जनजागृती समितीने आम्ही (श्री राजपूत करणी सेनेने)काय करायचे ?, याचा आदेश द्यावाआम्ही सर्वजणम्हणजेच श्री राजपूत करणी सेनेचे अधिकृत लाख 94 सहस्र राजपूत कर्तव्य आणि धर्मकार्य म्हणून त्यात सहभागी होऊमहाराणा प्रताप यांनी त्या काळी हिंदु राष्ट्राचा संकल्प केला होता आणि तो संकल्प आपण सर्वजण मिळून पूर्ण करूयाअसे जाज्वल्य प्रतिपादन जोधपूर (राजस्थानयेथील श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक  लोकेंद्रसिंह कालवी यांनी केले

ते रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थानमधील श्री विद्याधिराज सभागृहामध्ये आयोजिलेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये पद्मावत चित्रपटामध्ये झालेले इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी हिंदु समाजाचे संघटन या विषयावर बोलत होतेया वेळी सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी  लोकेंद्रसिंह कालवी यांचा विशेष सन्मान केला.

धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला जगातील एकमेव देश भारत ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र, पूर्व संचालक, धर्मपाल शोध पीठ, भोपाळ, मध्यप्रदेश

युरोपमध्ये कोणतेही राष्ट्र निधर्मी नाहीतर प्रत्येक देशाचा एक स्वतंत्र धर्म आहेयुरोपमध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही नसून चर्चच्या अंकीत असलेल्या शासकांचे राज्य आहेतेथील न्यायव्यवस्थाशिक्षणव्यवस्था यांवरही चर्चच्या व्यवस्थेचा प्रभाव आहेकेवळ भारत असा देश आहे कीजो धर्मनिरपेक्ष (सेक्युलरलोकशाही असलेला आहेभारतात लोकशाही असून कोणीही स्वतंत्र शासक नाहीराष्ट्रपतीपंतप्रधान हे केवळ इंग्रज सोडून गेलेल्या आणि त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत.  लोकशाहीला जनतेचे राज्य म्हटले जात असलेतरी भारतात लोकशाहीत लोकांना केवळ मतदान करण्याचा अधिकार आहेराज्य करण्याचा नाहीसंविधानाच्या हिंदीतील अधिकृत कागदपत्रांत सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष असा अर्थ नसून पंथनिरपेक्ष असा अर्थ आहेत्यामुळे पंथनिरपेक्षता हटवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करायला हवी.त्या स्थापनेच्या हेतूने धर्मनिष्ठ हिंदूंना संघटित करून भ्रष्ट आणि अत्याचारी यांना शासन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा.रामेश्‍वर मिश्र यांनी केले.

सलमान खान, आमीर खान आदी कलाकार आणि दूरचित्रवाणीवर बोलणारे मुसलमान नेते हे छद्म मुसलमान !
– प्रा. कुसुमलता केडिया, पूर्व संचालक, हिंदु विद्या केंद्र, वाराणसी, उत्तरप्रदेश

        संगीतनृत्यनशाचित्रछायाचित्रमूर्ती अशा गोष्टी इस्लाममध्ये प्रतिबंधित आहेतइस्लाममध्ये निषिद्ध मानलेल्या गोष्टी करणार्‍यांना शरियत कायद्यानुसार कठोर शिक्षा आहेततरीही सलमान खानआमीर खान आदी कलाकार चित्रपटांमध्ये काम करतातमुसलमान राजकीय नेते दूरचित्रवाणीवर बोलतात छायाचित्र काढण्याला प्रतिबंध असल्यानेहे सर्व तर इस्लामचे उल्लंघनच करत आहेतअशांना मुसलमान कसे म्हणता येईल हे तर छद्म मुसलमान आहेतते पैगंबरांच्या शिकवणीचा उपहास करत आहेतइस्लामच्या नावाखाली स्वैराचाराचे लायसन्स म्हणून हे छद्म मुसलमान कार्यरत आहेतआजचे मुसलमान स्वतःला कट्टरतावादी मानत असले आणि लहानसहान गोष्टींमुळे इस्लामचा अपमान होण्याची आवई उठवत असले तरीप्रत्यक्षात मुसलमानांमधील शरियतमध्ये गुन्ह्यांसाठी दिल्या जाणार्‍या शिक्षा मान्य असणारे आणि इस्लाममध्ये प्रतिबंधित केलेल्या गोष्टी न करणार्‍या मुसलमानांची गणना केलीतर ते प्रमाण नगण्य आहेत्यामुळे देशापुढील खरे संकट हे अशा छद्म मुसलमानांचेच आहेअसे प्रतिपादन प्राकुसुमलता केडिया यांनी अवैध कृत्यांचे प्रमाणपत्र घेतलेले छद्म मुसलमानांचे हिंदु राष्ट्रापुढे आव्हान या विषयावर केले.

       अधिवेशनाच्या प्रथमदिनी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे शासनाद्वारे होत असलेले दमनज्ञाती संस्था आणि संप्रदाय यांच्या माध्यमांतून धर्म अन् संस्कृती यांचे रक्षण आदी विषयांवर उपस्थित मान्यवरांनी हिंदुत्वनिष्ठांचे उद्बोधन केलेअधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीच्या प्रथम सत्रात हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता या विषयावर भोपाळ (मध्यप्रदेशयेथील धर्मपाल शोध पिठाचे पूर्व संचालक प्रारामेश्‍वर मिश्र,ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव  अनिल धीरकोलकाता येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉशिवनारायण सेनपुणे येथील यूथ फॉर पनून काश्मीरचे राष्ट्रीय संयोजक  राहुल कौलवाराणसी (उत्तरप्रदेशयेथील हिंदु विद्या केंद्राच्या पूर्व संचालक प्राकुसुमलता केडिया यांसह अन्य मान्यवर उपस्थित होतेया अधिवेशनाला देशविदेशातील 150 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 350 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्रीसुमीत सागवेकर यांनी केले.