हिंदु राष्ट्र नेपाळ ‘धर्मनिरपेक्ष’ होण्यामागे ‘युरोपीय युनियन’ आणि काँगे्रस शासन !  – डॉ. माधव भट्टराई

0
601

      रामनाथी (गोवा) – भारतामध्ये ज्या प्रकारे मुसलमान आक्रमकांच्या विरोधात युद्ध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापिलेत्या प्रकारे नेपाळचे महाराजे पृथ्वीनारायण शाह यांनी 300 वर्षांपूर्वी नेपाळला एकत्रित केलेज्या काळात ब्रिटीश भारतामध्ये हैदोस घालत होतेतेव्हा महाराजा पृथ्वीनारायण यांनी ब्रिटिशांना नेपाळच्या भूमीत पायही रोवू दिले नाहीत्यामुळे नेपाळमधील एकाही हिंदूचे धर्मांतर होऊ शकले नाहीयाचा प्रतिशोध घेण्यासाठीतसेच कधीही गुलाम न राहिलेल्या नेपाळची संस्कृती नष्ट करण्यासाठी युरोपीय युनियन गेल्या काही दशकांपासून प्रयत्नरत आहेलोकशाहीच्या नावाने आंदोलन करत येथील राजतंत्र नष्ट करण्यात आले.नेपाळमध्ये रहात असलेले 95 टक्के लोक हे ‘हिंदु राष्ट्रा’चे आजही समर्थन करतातया विषयी जनमतचाचणी घेण्यात येणार होतीपरंतु युरोपीय युनियनसाम्यवादी आणि ख्रिस्ती यांच्या षड्यंत्रामुळे ही चाचणी न घेता नेपाळच्या संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडण्यात आलापरिणामी जगाच्या पाठीवर असलेले एकमात्र हिंदु राष्ट्र नष्ट झालेभारतातील तत्कालीन काँग्रेस शासनाचाही याच्यामागे डाव होता’,अशी माहिती काठमांडू (नेपाळयेथील ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’चे अध्यक्ष डॉमाधव भट्टराई यांनी दिलीते रामनाथीगोवा येथे चालू असलेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने ‘नेपाळचे वर्तमान राजनैतिक परिदृश्य आणि हिंदु राष्ट्र आंदोलनाची आगामी दिशा’ या विषयावर आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होतेया वेळी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पवित्र खडकानेपाळमध्ये कार्य करणारे आणि मुंबई येथील ब्रह्मांडीय उपचारी संघाचे संचालक  राजेंद्र आलखहिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक  चारुदत्त पिंगळे आदी मान्यवरही उपस्थित होते.

       डॉभट्टराई पुढे म्हणाले, ‘‘नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आम्ही समविचारी संघटनांचे संघटन करत आहोतया समवेतच राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरांवर सभापंडित संमेलनेपरिषदा इत्यादींच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जनजागरण करण्यात येत आहेया पार्श्‍वभूमीवर आम्हाला भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून नैतिक सहकार्याची अपेक्षा आहे.’’

 
श्रीलंकेतील हिंदूंच्या पारंपरिक भूमीत अन्य धर्मियांचे अतिक्रमण !

अधिवेशनात प्रत्येक वर्षी उपस्थित रहाणारे श्रीलंका येथील ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ मरवनपुलावू सच्चिदानंदन् हे यंदा उपस्थित राहू शकले नाहीत.त्यांनी अधिवेशनाला त्यांचे प्रतिनिधी पाठवले आहेतसच्चिदानंदन् यांनी श्रीलंकेतील तमिळी हिंदूंची दु:स्थिती विशद करतांना कळवले आहे की, ‘‘श्रीलंकेतील पारंपरिक हिंदु प्रदेश असलेली भूमी गेल्या 25 ते 30 वर्षांत मुसलमानांनी गिळंकृत केली आहेयासाठी त्यांना आखाती देशांतून निधी पुरवला जात आहेआमपराई आणि त्रिंकोमाली हे हिंदुबहुल जिल्हे आता मुसलमानबहुल झाले आहेतदुसरीकडे पाश्‍चात्त्य चर्चपुरस्कृत सहस्रो ख्रिस्ती मिशनरी संस्था येथील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात गुंतल्या आहेतभारत शासनाकडे आमची मागणी आहे कीत्यांनी श्रीलंका शासनावर दबाव आणून मुसलमान आणि ख्रिस्ती मिशनरी यांना विदेशातून येणार्‍या संपूर्ण निधीवर निर्बंध घालण्यास भाग पाडावेतसेच श्रीलंकेतील यादवी युद्धात ज्या हिंदु मंदिरांचा विध्वंस झाला आहेत्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी भारतातून तज्ञ मूर्तीकार आणि शिल्पकार पाठवावेतअन्यथा या मंदिरांच्या जागी चर्चमशिदी आणि बौद्ध विहार बांधले जातील.’’

        या वेळी चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली चालू असलेले अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवरील अन्याय पहाता मोदी सरकारने नेपाळमधील निधर्मी राज्यघटना रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेतनेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासंदर्भातील नेपाळी जनतेच्या मागणीला सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा संपूर्ण पाठिंबा आहेनेपाळमध्ये प्रलोभने दाखवून अथवा बळजोरीने करण्यात येणार्‍या नेपाळी हिंदूंच्या धर्मांतराला आळा बसायला हवाया समवेतच श्रीलंकेतील तमिळी हिंदूंची व्यथा आम्ही जाणतोत्यांना न्याय मिळण्यासाठीही सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन कटीबद्ध आहे.’’