गोव्यात आलात तर समुद्र स्नान टाळा

0
343
गोवा खबर:वीकेंड साठी गोव्यात जाणार असाल तर हवामानाचा प्रथम अंदाज घ्या.. पर्यटक आणि समुद्राशी संबंधीत इतर घटककांनी येत्या 72 तासांत गोव्याच्या समुद्रात जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा सरकारने नेमलेल्या दृष्टी ह्या जीवरक्षक संस्थेच्या यंत्रणेने दिला आहे.
अरबी समुद्राच्या नैरुत्य दिशेने मेणूकू नावाचे वादळ घोंगावू लागले असल्याने समुद्रकिनाऱ्या वरील हवामानावर व समुद्रातील स्थितीवर त्याचा प्रभाव पडू शकेल. त्यामुळे कुणी पुढील 72 तास समुद्रात न जाणो योग्य ठरेल, असे दृष्टी संस्थेने कळवले आहे.
वादळामुळे भरतीवेळी मोठय़ा लाटा किनाऱ्यावर येण्याची शक्यता आहे. किनारपट्टीतील सखल भागात अशी शक्यता जास्त प्रमाणात आहे, दृष्टी संस्थेचे म्हणणे आहे. मोठया वेगाचे वारे पुढील 72 तास समुद्रावर वाहू शकतील अशी शक्यता आहे. समुद्रात जे उतरत असतात त्यांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे व शक्यतो समुद्रात उतरूच नये असा सल्ला पर्यटकांना व इतरांना दृष्टी संस्थेने दिला आहे.
दरम्यान, सध्या पर्यटन मोसम असल्याने व उकाडा असह्य होत असल्याने लाखो पर्यटक सागरकिनाऱ्यावर आलेले आहेत. या दिवसांत पोहण्यासाठी तसेच जलक्रिडा करण्यासाठी बरेच पर्यटक समुद्रात उतरत असतात.उत्तर गोव्यात मिरामार, कांदोळी, कळंगुट, बागा, वागातोर, मांद्रे, मोरजी, आश्वे, सिकेरी, हरमल असा सारा सागरकिनारा पर्यटकांनी सध्या फुललेला आहे. दृष्टी यंत्रणोकडे सुमारे 600 जीवरक्षक आहेत. 105 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर जीवरक्षकांची पथके लक्ष ठेवून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here