पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्यप्रदेशात राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा प्रारंभ करणार

0
319

 

गोवाखबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त मध्यप्रदेशातल्या मांडला इथे भेट देणार आहेत. एका जनसभेत पंतप्रधान राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा शुभारंभ करतील आणि मांडला इथून देशभरातल्या पंचायत राज प्रतिनिधींना संबोधित करतील.

येत्या पाच वर्षासाठी आदिवासी विकासाचा पथदर्शी आराखडा पंतप्रधान यावेळी सादर करणार आहेत. मांडला जिल्ह्यातल्या मनेरी इथे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या एलपीजीबॉटलींग प्लँटचे भूमीपूजनासाठीच्या फलकाचे अनावरण पंतप्रधान करतील. स्थानिक सरकारी मार्गदर्शक पुस्तिकेचेही पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन होईल.

स्वच्छा निरोगी आणि विद्युतीकरणयुक्त भारतासाठीची सरकारची कटिबद्धता लक्षात घेऊन, 100 टक्के धुरविरहीत स्वयंपाकघरे, मिशन इंद्रधनुषअंतर्गत 100 टक्के लसीकरण उद्दीष्ट साध्य करणाऱ्या तसंच सौभाग्य योजनेअंतर्गत, विद्युतीकरणाचे 100 टक्के उद्दीष्ट साध्य करणाऱ्या खेड्यांच्या सरपंचाचा, पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

सर्व श्रेष्ठ पंचायत पुरस्कार योजनेअंतर्गत, राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्कार आणि ग्राम पंचायत विकास पुरस्कार योजनेच्या विजेत्यांचा यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात येईल.

मध्य प्रदेशातल्या विकासाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here