चोपडे अपघातात रशियन महिला ठार

0
542

गोवाखबर:चोपडे आगारवाडा सरकारी प्राथमिक शाळेजवळ झालेल्या अपघातात एना ड्रेम्लुया ही रशियन महिला पर्यटक जागीच ठार झाली. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. शाळेजवळ असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने बुलेट दुचाकीवरील ताबा निसटल्याने तोल जाऊन ती रस्त्यावर कोसळली. त्याचवेळी मागून येणार्‍या टेम्पोखाली तिचे डोके सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा पती व्लादिमीर याला जखमी अवस्थेत म्हापशातील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.गतिरोधक रंगवले नव्हते, शिवाय सूचना फलकही लावले नव्हते. त्यामुळे विदेशी पर्यटक महिलेला त्याचा अंदाज आला नाही.