सिंधुदुर्गातील रुग्णांवर मोफत उपचार नाहीच;आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून तोडगा काढणार:आरोग्यमंत्री

0
381

गोवा:मी गोव्याचा आरोग्यमंत्री आहे.गोव्यातील जनतेचा मी पहिल्यांदा विचार करणार. कोणत्याही परिस्थितीत गोव्या बाहेरील रुगणांवर मोफत उपचार केले जाणार नाहीत.आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सामंजस्य कराराच्या माध्यमातून गोव्याला भरपाई कशी मिळेल यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज दिली.
महाराष्ट्रात दोडामार्ग येथे झालेले जनआक्रोश आंदोलन आणि गोव्या बाहेरील रुग्णांकडून आकरल्या जात असलेल्या शुल्का बाबत वृत्तपत्रा मधून येत असलेल्या उलट सुलट बाटम्यांच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज स्पष्टीकरण दिले.
गोव्या बाहेरील रुगणांवर कोणत्याही परिस्थिती मध्ये मोफत उपचार केले जाणार नाहीत याचा पुनरुच्चार करून राणे म्हणाले,महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कडील रुगणांवर मोफत उपचार हवे असतील तर त्यांनी त्यासाठी लागणारे पैसे गोवा सरकारला द्यायला हवे.हे पैसे कोणत्या स्वरुपात दिले आणि घेतले जातील यावर आजच्या बैठकीत चर्चा होऊन तोडगा काढला जाईल.
नीलेश राणे यांनी दिलेल्या गोवा बंदच्या इशाऱ्यावर बोलताना राणे म्हणाले,नीलेश राणे यांची दादागिरी गोव्यात चालू दिली जाणार नाही.ही मुंबई नाही.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलेल्या सूचने नुसार उद्या फडणवीस यांना भेटून तोडगा काढला जाईल.