खूनी हल्ला प्रकरणी कळंगुट मध्ये एकास अटक

0
450
गोवाखबर :चाकूने भोसकून एकास गंभीर जखमी केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी अमेय धारगळकर  याला अटक केली आहे.त्याच्याकडून हल्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात देखील पोलिसांना यश मिळाले आहे.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उमताववाडो येथील हरिश्चंद्र हॉलिडे होम गेस्ट हाउस मध्ये  एकाला भोसकून जखमी केल्याची  खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर धारगळकर याला अटक करून त्याच्याकडून हल्ल्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला.हा हल्ला गैरसमजूतीमधून झाल्याचे सांगण्यात आले. अमेय हा आपला थकित पगार न मिळाल्याचा जाब विचारायला गेला असता अचानक लाइट गेली.त्याच दरम्यान विश्वजीत समोर आला.अमेयचा आणि विश्वजीतचा एकमेकांशी काहीच संबंध नाही.अमेयच्या चुकीमुळे विश्वजीतचा जीव धोक्यात आला.  हल्ल्यात जखमी झालेल्या विश्वजीत राऊत याला तातड़ीने गोमेकॉमध्ये हलवण्यात आले आहे.पोलिस निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक पुढील तपास करत आहेत.