महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या बनल्या पॅडवूमन

0
380

गोवा खबर:महिलांनी आरोग्याची काळजी घेताना स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी.मासिक पाळी वेळी आरोग्यास घातक कपडा वापरण्या ऐवजी सॅनेटरी नॅपकीन वापरा, असे आवाहन करत गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राजधानी पणजी मधील झोपडपट्टी मधील महिलांना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने आज पणजी मधील झोपडपट्टी भागात सॅनेटरी नॅपकीनचे वाटप केले. मासिक पाळी वेळी कपड़ा वापरल्याने काय आजार होतात याची माहिती देत सगळ्या घरांमधील महिलांना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.महिला काँग्रेसने 1 ते 7 मार्च दरम्यान राज्यभरातून सॅनेटरी नॅपकीन गोळा केली होती.आज त्याचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here