पर्रिकर यांच्यावर आणखी काही काळ लीलावती मध्ये होणार उपचार:सावईकर

0
361

गोवाखबर: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री पर्रीकर यांना उपचारार्थ आणखी काही काळ मुंबईच्या लीलावती इस्पितळात रहावे लागणार आहे. त्यांच्यावर योग्य दिशेने उपचार चालू आहेत आणि उपचारांना ते प्रतिसादही देत आहेत. या आजारातून उठण्यासाठी त्यांना आणखी काही काळ लागणार आहे. तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत असून त्यांना लचकर आराम मिळो, अशी प्रार्थना आम्ही करीत आहोत,असे भाजपचे नेते तथा दक्षिण गोव्याचे खासदार यांनी अधिकृतपणे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

Lilavati Hospital, Mumbai. 

खासदार सावईकर तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, संजीव देसाई, दत्ता खोलकर आदी नेत्यांनी आज लीलावती इस्पितळात भेट दिली परंतु उपचार चालू असल्याने त्यांना पर्रीकरांची प्रत्यक्ष भेट मिळू शकली नाही. सध्या त्यांना कोणालाही भेटायला दिले जात नाही. सभापती प्रमोद सावंत यांनी आज पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. पर्रिकर यांची प्रकृती सुधारत असून उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे सावंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here