पेडणे येथे प्रस्तावित कार्निव्हलला विरोध

0
638
राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत म्हापसा येथे  हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !
म्हापसा – कार्निव्हल ही आपली संस्कृती नाही, तरीही पेडणे भागात कार्निव्हलचे आयोजन करण्याचा शासानाचा प्रयत्न आहे. पेडणे परिसरातील राष्ट्रप्रेमी नागरिक या कार्निव्हलला संघटितपणे विरोध करत आहे. पेडणे येथील कार्निव्हलला विरोध करणार्‍या राष्ट्रपे्रमी नागरिकांना हिंदु जनजागृती समिती पाठिंबा दर्शवत आहे. अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन सुविधा, विकास दर आणि आर्थिक स्थिती यांवर गंभीर परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी सर्व नागरिकांसाठी समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे, तसेच त्यांना त्यांच्या हक्काचे स्वतंत्र ‘होमलँड’ देण्यात यावे. माघ मेळ्यानिमित्त देशातील विविध राज्यांत होणारे हिंदूंचे सण आणि धार्मिक उत्सव यांच्या काळात होणारी रेल्वे आणि बस यांच्या तिकिटांतील वाढ त्वरित रहित करावी. या मागण्यांना अनुसरून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली रविवार, २८ जानेवारी या दिवशी ११ वाजता म्हापसा नगरपालिका बाजार, मुख्यद्वार (गणपति पूजन करत असलेल्या ठिकाणी) येथे निदर्शने केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता.
शंखनाद केल्यानंतर आंदोलनाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या सौ. राजश्री गडेकर यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा विषय स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले आणि या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला. देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मियांसाठी समान कायदे नसल्याने अल्पसंख्यांकांची लोकसंख्या भरमसाठ वाढत चालली आहे. सद्यस्थितीत जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम आणि मणिपूर ही राज्ये आणि लक्षद्वीप आणि निकोबार हे केंद्रशासित प्रदेश यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. हे न रोखल्यास वर्ष २०३० पूर्वी भारतात हिंदू अल्पसंख्य होतील, असा दावा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनीही केला आहे. त्यामुळे ‘लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन’ राखणारा कायदा सर्व धर्मियांना लागू करणे आवश्यक आहे. संजय लीला भन्साळी प्रोडक्शन यांनी कोल्हापूर जिल्हातील पन्हाळा येथील मसाई पठार येथे पद्मावत या वादग्रस्त चित्रपटाचे २० दिवस चित्रीकरण केले होते; मात्र चित्रीकरणासाठी नियमानुसार शासनाला देय असलेल्या एकूण १ लक्ष ९१ सहस्र ४५८ रुपयांच्या शुल्कापैकी १ लक्ष ६२ सहस्र ७४२ रुपयांचे शुल्क बुडवून शासनाची फसवणूक केली आहे. तसेच पोलीस, वन विभाग आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी अनुमती देण्यापूर्वी संबंधित व्यक्ती अन् संस्था यांच्याकडून चित्रीकरणासाठी अनुमती घेण्याची अट घातली होती; मात्र ती न पाळता चित्रीकरण करून शासनाची पुन्हा फसवणूक करण्यात आली आहे. हा फौजदारी गुन्हा आहे. संजय लीला भन्साळी प्रोडक्शन्स यांच्याकडून याप्रकरणी दंडवसूली करावी आणि सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. गोवा शासनाने या मागणीची महाराष्ट्र शासनाकडे पुर्तता करावी. शेवटी श्री. गोविंद चोडणकर यांनी ठराव मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पंकज बर्वे यांनी केले. आभारप्रदर्शन कु. कल्पिता गडेकर यांनी केले.
आंदोलनामध्ये सहभागी संघटना – हिंदु जनजागृती समिती; सनातन संस्था; रणरागिणी शाखा; गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ; पेडणे, डिचोली, म्हापसा, संभाजीनगर आणि सांखळी येथील धर्म आणि राष्ट्रप्रेमी