बीफचा बहुतेक सगळा कारभार बेकायदेशीर:गोवंश रक्षा अभियानचा दावा

0
344
गोवा खबर:गोव्यात कर्नाटक मधील ज्या कत्तलखान्यातून बीफ येते तो कत्तलखाना बेकायदेशीर आहे.ज्या डॉक्टरचे प्रमाणपत्र घेऊन बीफ आणले जाते तो देखील बोगस असून गोव्यात जो काही बीफ व्यवसाय चालतो तो बेकायदेशीर आहे,असा दावा गोवंश रक्षा अभियानतर्फे आज करण्यात आला.
गोवंश रक्षा अभियानतर्फे आयोजीत पत्रकार परिषदेत संस्थेचे प्रमुख हनुमंत परब म्हणाले,गोव्यात चालू असलेला बीफचा व्यवसाय बेकायदेशीर असून विकले जाणारे मांस आरोग्यास घातक असेच आहे.कोणतेही नियम आणि कायदा न पाळता गोव्यात बीफ विकले जाते.गाय ही आमच्यासाठी माता असल्याने आम्ही असल्या प्रकारांना कायदेशीर मार्गाने विरोध करत आहोत.
परब यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्यावर जोरदार टिका केली. सरदेसाई यांनी बीफ विक्रेत्यांची बाजू घेण्यापेक्षा महाग झालेले नारळ लोकांना स्वस्त कसे मिळतील याकडे लक्ष द्यावे असा सल्ला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here