दाबोळी विमानतळावर ४३ लाख ७० हजार रूपयाचे परकीय चलन जप्त

0
504
 गोवा खबर:दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टमच्या हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांनी  संशयास्पद हालचालीवरून दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ४३ लाख ७० हजार रूपये किंमतीचे परकीय चलन जप्त केले.
 एक आंतरराष्ट्रीय आणि एक देशी प्रवाशी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ओमन एअरववेजच्या विमानाने दुबईला जाण्यासाठी आले होते. या विमान तळावरून सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने या विमानतळावरील कस्टमचे हवाई गुप्तहेर अधिकारी नेहमीच सतर्क असतात. या विभागाचे सहाय्यक आयुक्त जी़बी़ सांतीमानो यांच्या मार्गदर्शनाखाली हवाई गुप्तहेर प्रवाशांच्या हालचालीवर नजर ठेऊन होते. त्यांना कक्षामध्ये सदर दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद दिसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी दोन्ही प्रवाशांना अडवले आणि त्याच्या जवळ असलेल्या बॅगेची झडती घेतली.त्यात  या दोन्ही प्रवाशांकडे सुमारे ४३ लाख ७० हजार रूपयांचे परकीय चलन सापडले. विमानात चढण्यापुर्वी या प्रवाशाच्या सामानाची तपासणी झाली होती. या दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यानी हे परकीय चलन दुबईला तस्करीमार्गाने नेत असल्याची कबुली दिली. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सदर चलन कस्टम कायदा आणि फेमा कायद्या अंतर्गत जप्त केले आहे.कस्टमचे आयुक्त आऱ मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून त्याची पुढील चौकशी चालु आहे.