गोवा खबर:जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केलेल्या तुफान गोळीबारात पाकिस्तानचे आठ ते दहा सैनिक ठार झाल्याचे समजते.