छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जॅकेट घातले, म्हणून युवकाची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या !

0
505

दंगली भडकवण्यास कारणीभूत असलेल्या जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांना अटक करा !

इंग्रजांच्या भीमाकोरेगाववरील विजयदिनाच्या निमित्ताने झालेल्या दंगलीत राहुल पठांगडे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीदंगलीत कोणताही सहभाग नसतांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जॅकेट घातले असल्याने या युवकाची हत्या करण्यात आलीअशी वृत्ते माध्यमांतून येत आहेतया प्रकरणी पोलिसांनी माहिती का दाबून ठेवली या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जॅकेट घातल्याने एखाद्याची हत्या होतेहे अत्यंत दुर्दैवी आहेमहाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी ही घटना आहेहिंदु जनजागृती समिती या हत्येचा निषेध करतेया निर्घृण हत्या करणार्‍यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावीअशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहेया मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही वैधमार्गाने पाठपुरावा करूअसे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक  सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

चार वर्षांपूर्वी पुण्यातच मोहसीन शेख या युवकाची हत्या झालीती कोणी केलीहे आजवर सिद्ध झालेले नाहीतरीही हिंदु राष्ट्रसेनेचे प्रमुख  धनंजय देसाई गेली चार वर्षे तुरुंगात आहेतकालच्या दंगलीला चिथावणी देणारे आणि रस्त्यावर उतरून युद्धाची भाषा करणारे गुजरातचे नवआमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद मात्र अद्याप मोकाट का आहेतभारत तेरे तुकडे होंगेच्या घोषणा देणारा अन् देशद्रोहाचा खटला दाखल झालेला उमर खालिद आणि मेवाणी यांना पुण्यात येऊन अशी भाषणे देण्याची व्यवस्था करणार्‍यांचे अदृश्य हात कोणते आहेतहे शोधले पाहिजेराज्यातील जातीय सलोखा बिघडवण्यामागे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे कायाची राज्यशासनाचे विशेष पथकाद्वारे चौकशी करावीअशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे.

सुनील घनवट,

राज्य संघटकहिंदु जनजागृती समिती.

संपर्क : 9404956534