‘बायकिंग क्विन्स’ या मोटारसायकल स्वार महिलांच्या पथकानं घेतली पंतप्रधानांची भेट

0
693
A group of women motorbike riders from Gujarat - the Biking Queens, calling on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on August 28, 2017.

 

‘बायकिंग क्विन्स’ या गुजरातमधल्या मोटारसायकल स्वार 50 महिलांच्या पथकाने आज नवी दिल्लीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
आपण 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 10 हजार किलो मीटरपेक्षा जास्त प्रवास केला असून, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छ भारत यासारख्या सामाजिक मुद्यांवर जनतेशी संवाद साधल्याचे या पथकाने म्हटले आहे. 15 ऑगस्ट 2017 रोजी त्यांनी लडाख मधल्या खारदुंगला इथे तिरंगा फडकावला.