उत्तर प्रदेशमध्ये कलिंग-उत्कल एक्स्प्रेस रुळांवरुन घसरली; १० ठार

0
402

उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये कलिंग-उत्कल एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. या अपघातामध्ये एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरले. अपघातात १० जण ठार झाले असून सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खतौलीजवळ हा अपघात झाला.

घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले असून एनडीआरएफची टीमही दाखल झाली आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेश एटीएसचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ही एक्स्प्रेस हरिद्वारला जात होती.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी दाखल होण्याचे निर्देश दिले आहेत. बचावकार्यावर आपण स्वत: लक्ष देत असून उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here