पणजी मतदारसंघाच्या विकसासाठी मनोहर पर्रिकर हे अपयशी ठरले असून त्यांनी हिम्मत असेल तर पणजीच्या विकासावर खुली चर्चा करावी असे आव्हान काँग्रेसचे पणजीचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी पर्रिकर यांना दिले.
येथील आंध्र बँकेवर आज गिरीश चोडणकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्धाटन काँग्रेस निरीक्षक डॉ. चेल्लाकुमार,प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक, महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो,आमदार आलेक्स रेजिनाल्ड ,युवा नेते जनार्दन भंडारी,सावित्री कवळेकर,आयरिश रॉड्रिग्ज, सिद्धनाथ बुयाव आदी उपस्थित होते.
काँग्रेसने आज देखील पर्रिकर पणजीच्या विकसात अपयशी ठरल्याचा आरोप केला. शांताराम नाईक यांनी पर्रिकर हे संरक्षणमंत्री म्हणून अपयशी ठरल्याचा आरोप करत रॉय नाईक आणि चोडणकर यांचा विजय निश्चित असल्याचा आरोप केला. आयरिश रॉड्रिग्ज यांनी पर्रिकर यांच्यावर जोरदार टिका करत काँग्रेस उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here